Uddhav Thackeray | “देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा” ; उद्धव ठाकरे यांची आक्रमक टीका!

Uddhav Thackeray |  बुलढाणा : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथी नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. बुलढाण्यातील चिखली मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभा घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याकडे उद्धव ठाकरे गटाचे विशेष लक्ष आहे. बुलढाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.

राज्यात वीज कापणी सुरु आहे. लाईट बिलासाठी तकादा लावला जात आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ ऐकवत टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधात असताना वीज बिल माफीची मागणी केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले, “आज तुम्ही त्या ठिकाणी आणि मी या ठिकाणी आहे. शेतकर्‍यांचे वीज बील माफ करा! खाली असताना वेगळी भाषा आणि वर बसल्यावर वेगळी भाषा? देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा!”

“देवेंद्रजींना देखील सांगतो, तमाम शेतकर्‍यांची वीजबील रक्कम तुम्हीं महावितरणकडे जमा करा आणि शेतकर्‍यांना आम्हीं कर्जमुक्त केल होत, तुम्हीं वीजबिलमुक्त करा,”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदेवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज गेलेत नवस फेडायला, गेल्या आठवड्यात गेले हात दाखवायला. ज्यांना स्वत:च भवीष्य माहित नाही ते राज्याच भविष्य काय ठरवणार?. मी मनापासुन सांगतो, त्यांना गुवाहाटीला आशीर्वाद घ्यायला जाव लागलं, मी तुमचे, शेतकर्‍यांचे माता-भगिनींचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. यांना (शिंदे गट) नाव बाळासाहेबांच पाहिजे, नाव शिवसेनेच पाहिजे आणि आशीर्वाद मोदीजींचा पाहिजे. मग यांची स्वत:ची मेहनत काय?”

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे –

 • जुने चेहरे आज दिसत नाहीत… ते फसवे निघाले, गद्दार निघाले. आज तुमच्याकडे पाहुन वाटतंय या धगधगत्या मशाली अन्याय जाळायला निघाल्या आहेत.
 • मी मनापासुन सांगतो, त्यांना गुवाहाटीला आशीर्वाद घ्यायला जाव लागलं, मी तुमचे, शेतकर्‍यांचे माता-भगिनींचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे.
 • पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच या ध्येयाने आज निघालो आहे. या गद्दारांना तुम्हींच आमदार-खासदार केल होतं.
 • ताई मोठ्या हुशार… थेट पंतप्रधानांना जाऊन राखी बांधली, फोटो छापुन आणला. भैया मेरे राखीके बंधन को निभाना| मग काय ईडी वाले कारवाई करणार?
 • आपल्याला हुकुमशाही हवी की लोकशाही हा महत्त्वाचा प्रश्न.
 • दसरा मेळावा शिवतिर्थावर झाला तेंव्हाच ठरवल होतं, मुंबई बाहेर पहिली सभा होईल ती बुलढाण्यात जिथे जिजाऊंचे जन्मस्थान आहे तिथेच घेईन. ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर आई जिजाऊंचा आशीर्वाद घेऊनच.
 • तुम्ही यादी काढा यांच्यात यांच्या पक्षाचे किती आणि आयात किती? हा पक्ष आहे की चोरबाजार? स्वत:च काही शिल्लक नाही म्हणून बाहेरुन सगळे घेऊन समोर उभे केलेत.
 • तुम्ही आमचे देव पळवणार आणि आम्हीं काय षंढासारख बघत बसणार?
 • आमच्या दैवताचा पुराने आदर्श म्हणून उल्लेख करणार आणि आम्हीं शेपुट घालुन बसायचं?
 • तो एक अब्दुल ‘गटार’….  मी मुख्यमंत्री असताना महिलांचा अपमान करणार्‍यांना हाकलल होतं… तुम्ही काय केलत?
 • हिंमत असेल तर मागील वेळेस जस जाहिर केल तेंव्हा तिथुन जाहिर करा, महाराष्ट्र सरकारमधुन बाहेर पडतोय. तुमच भविष्य पहायला ज्योतिष्याकडे जाता, नवसाच बाळ हे सरकार वाचाव म्हणून नवस फेडायला जाता.
 • आपण ‘देता की जाता’ आंदोलन केल होत तेव्हा केंद्र सरकारने शेतकर्‍यांना मदत केली होती. मुख्यमंत्री झाल्यावर नागपूरला अधिवेशनात जाहिर केले शेतकर्‍यांना कर्जमुक्त करेन आणि करून दाखवलेलं!
 • हे खोके सरकार जेंव्हापासुन खुर्चीवर बसले तेंव्हापासुन महाराष्ट्राला पनवती लागली आहे…. 1 जुलै पासुन हजारच्या आसपास शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. कशाचे नवस फेडताय?
 • वीमा कंपन्यांची मस्ती एकदा मोर्चा काढुन उतरवली होती, ती परत चढली असेल तर उतरवण्याची वेळ आली आहे.
 • पंतप्रधान म्हणतात मी रोज किलो-दीड किलो शिव्या खातो. तुमच बर आहे, शिव्या खाऊन पोट भरतं, आमच्या शेतकर्‍यांनी काय खायचं?
 • चॅनेलवाल्यांनी ही समोरच्या शेतकर्‍यांची प्रतिक्रिया दाखवावी.  वाट्टेल ते सांगायचे आणि रेटुन न्यायचं. पण जनता आता भोळी राहिलेली नाही.
 • मी मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ दिली नसती!
 • मी तुमच्यासोबत आहे हे सांगायला आलो आहे. आत्महत्या करायची नाही, शिवसेना तुमच्या सोबत आहे.
 • ही जी जुलुमशाही सुरु आहे, महाराष्ट्राचा अपमान करायचा प्रयत्न सुरु आहे, त्या विरोधात आता महाराष्ट्र बंद करण्याची वेळ आली आहे.
 • हे सर्व बनावट बोगस तोतये निघाले आहेत….
 • एक व्हिडिओ पाहिला, दिवाळीत मुख्यमंत्री रमले शेतीत… आपण स्पर्धा लावु, दुसरा एक शेतकरी दाखवा जो हेलिकॉप्टरने शेतात जातो. तुम्ही शेतीत कसे फिरता? हा शेतकरी मुख्यमंत्री गाडीने फिरतो. तुमच्या सुबत्तेबद्दल काही नाही. पण माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी कधी असा होईल का? शेतकर्‍याने हात दाखवायचा कुणाला?
 • शेतकर्‍याची थट्टा करता? जसे मिडीया घेऊन तिकडे गेलात तसे अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना भेटायला का गेला नाहीत?
 • घर सोडुन फिरत आहेत… या शेतकर्‍याची हालत, त्याची इज्जत सांभाळायची कोणी? तुम्हांला खोके मिळाले, यांच काय?
 • या बैलपोळ्याला मेसेज येत होते, बैलांना सजवल होतं, त्यांवर लिहिलं होत ‘पन्नास खोके, एकदम ओके’.
 • तुम्हीं पन्नास पन्नास घेतलेत, त्यातले काही शेतकर्‍यांना दिले असते तर त्यांचे जीव वाचले असते.
 • गद्दारांच करायच काय? (खाली डोक वर पाय… – जनसमुदा) ‘खाली डोक वर पाय’ तरी कस करणार? करायला डोक तरी हव ना. डोक असते तर तिकडे गेलेच नसते.
 • हिंदुत्व सोडले… हिंदुत्व सोडले… तुम्ही मुफ्तींसोबत युती केलीत ना? कॉंग्रेस ‘भारतमाता की जय’ ‘वंदे मातरम’ बोलतात, मेहबुबा मुफ्ती भारतमाता की जय बोलणार का?
 • या बोक्यांना खोक्याची हाव लागली म्हणून गेले. या सर्व गोरगरीबांनी रक्ताच पाणी करून तुम्हांला लोकसभेत, विधानसभेत पाठवलं.
 • तुमची गद्दार ही ओळख आता पुसली जाणार नाही… हारणे किंवा जिंकणे सोडुन द्या, परंतु जीवाभावाची नाती विसरून तुम्हीं केवळ काहीतरी मिळत म्हणून तिकडे जाता, त्यांना आता माफी नाही.
 • पंजाबच्या शेतकरी नमला नाही,मस्तवाल सरकारला त्यांनी झुकविले होते. नांगरात ताकद आहे. नांगरधारी शेतकर्‍याने हुकुमशहाला तेंव्हा देखील झुकवले होते… हे विसरू नका.
 • देवेंद्रजींना देखील सांगतो, तमाम शेतकर्‍यांची वीजबील रक्कम तुम्हीं महावितरणकडे जमा करा आणि शेतकर्‍यांना आम्हीं कर्जमुक्त केल होत, तुम्हीं वीजबिलमुक्त करा.
 • शिवसेना तुमच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरेल परंतु सर्व शेतकर्‍यांनी मला वचन द्या, ‘कितीही वाईट वेळ आली तरी आत्महत्या करणार नाही!’

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.