Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची कूटनीती आपल्याला कुटून टाकायची – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis) फडणवीस यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कुटनितीचा वापर करावा लागेल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. फडणवीसांच्या या टीकेला ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

We have to grind Chanakya and his diplomacy – Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “काल महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री म्हणाले की आमची ही कूटनीती  आहे. राष्ट्रवादीसोबत जाणं ही त्यांची कूटनीती आहे. आपल्याला त्यांची ही कुटून टाकायची आहे.

त्यानंतर त्यांना कळेल की जनतेचा खलबत्ता किती मोठा आहे. जनतेकडं मोठा खलबत्ता आहे. त्या खलबत्त्यामध्ये आपल्याला चाणक्य आणि त्याची कूटनीती कुटून बारीक करायची आहे.”

पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “भारतीय जनता पक्षाकडे लॉन्ड्री आहे असं म्हणतात. कारण भ्रष्टाचारी असला की त्याला ते लॉन्ड्रीमध्ये स्वच्छ धुऊन टाकतात.

बंगाल आणि कर्नाटकने त्यांच्या या लॉन्ड्रीची विल्हेवाट लावून टाकली आहे. त्याचप्रमाणे आपल्यालाही या लॉन्ड्रीची विल्हेवाट लावायची आहे.”

“शिवसेनेला मोठा धक्का अशा बातम्या सातत्यानं येत आहे. मात्र, आपल्याला धक्का देणारा अजून जन्मालाच आलेला नाही. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्यांनी फक्त शिवसेनेसोबत नाही तर जनतेसोबत देखील गद्दारी केली आहे. त्यांना या गद्दारीची किंमत चुकवावी लागेल”, असही ते (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46GgBPU