Uddhav Thackeray | “निवडणूक आयुक्त केंद्र सरकारच्या हाताचे बाहुलं” ; उद्धव ठाकरे यांचं म्हणणं सुप्रीम कोर्टालाही पटलं

Uddhav Thackeray | नवी दिल्ली: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) न्यायाधीशांसारखी सारखी व्हावी, अशी मागणी केली होती. कारण निवडणूक आयुक्त केंद्र सरकारच्या हातचं बाहुलं आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं. उद्धव ठाकरेंनी ही मागणी केली असताना सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सीबीआय प्रमुखांच्या नियुक्तीच्या धर्तीवरच निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात यावी, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली पाहिजे. पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश या समितीचा भाग असले पाहिजे. निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी ही समिती राष्ट्रपतींना एका नावाची शिफारिश करेल. राष्ट्रपतीच्या मंजुरीनंतरच मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड केली जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात म्हटलं गेलं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची निवड कॉलेजियमच्या धर्तीवर करण्यात यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश केम जोसेफ, अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, ऋषिकेश रॉय आणि सिटी रविकुमार यांनी हा निर्णय दिला आहे.

दरम्यान, मूळ पक्ष आपला असताना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर आपला संताप व्यक्त केला होता. निवडणूक आयुक्त दबावाखाली येऊन निर्णय घेत आहे, असे देखील उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.