Uddhav Thackeray | नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि बजोरीया यांना अपात्र ठरवा! विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटाचं पत्र

Uddhav Thackeray | मुंबई: आजपासून राज्यातील पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे गटानं मोठा निर्णय घेतला आहे. विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटनं पत्राद्वारे तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.

यामध्ये नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), मनीषा कायंदे (Manisha Kayande) आणि गोपीकिशन बजोरिया (Gopikishan Bajoria) यांचा समावेश आहे. ठाकरे गटाच्या या मागणीनंतर या तिन्ही आमदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि गोपीकिशन बजोरिया या तिन्ही नेत्यांचं पक्षांतर कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या तिघांना अपात्र घोषित करा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

या तिन्ही नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे करताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नव्हती. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसलं आहे.

The situation of farmers in the state is very bad – Balasaheb Thorat

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना अध्यक्ष यांनी बोलण्याची परवानगी दिली. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. राज्यात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत जाहीर झालेली नाही.”

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि ठाकरे गटानं विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून प्रचंड गोंधळ घालत राज्य सरकारचा जोरदार निषेध केला आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे, असा दावा विरोधकांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44vHwwo

You might also like

Comments are closed.