Uddhav Thackeray | ‘पाकिस्तानविरुद्धचा सामना आपण जिंकलो कारण…’, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

Uddhav Thackeray | मुंबई : राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर सामना अग्रलेखामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ‘मिंधे’ असा उल्लेख करत, त्याच्यावरही निशाणा साधला आहे.

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सामना अग्रलेखात

मिंधे गटाने जो सामना तीन महिन्यांपूर्वी जिंकला त्या गटातील खेळाडू अचानक कुबेर बनले. त्या कुबेरांचे लक्ष्मीपूजन काही ठिकाणी झाले. या चाळीस जणांमुळे ‘सामना’ जिंकल्याचा आनंद असा की, एका दिवसात 1900 किलो सोन्याची खरेदी झाली. हे सर्व मिंधे-फडणवीस सरकारमुळेच घडले, असं म्हणत सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

तसेच, भारताने पाकिस्तानविरुद्ध टी-20 वर्ल्डकपमध्ये जिंकलेल्या सामन्यावरूनही अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.  ‘ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आपण जिंकू शकलो. विराट कोहलीने एकदम धुवाधार फटकेबाजी केली. पण महाराष्ट्रात मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी ‘सामना’ जिंकून जगात चैतन्य पर्व निर्माण केले नसते तर भारतीय क्रिकेटपटूंच्या ‘बॅटी’ होळीत टाकण्याच्या लायकीच्याही राहिल्या नसत्या. भारताने मेलबर्न जिंकले याचे श्रेय मिंधे व फडणवीस यांनाच द्यावे लागेल. जगात सर्व काही घडते आहे ते त्यांचे सरकार आल्यामुळेच.

त्याचबरोबर ऋषी सुनक या भारतीय वंशाच्या तरुणाची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. हा नवा इतिहास रचला गेला तो कोणामुळे? अर्थात आपले पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रातील मिंधे-फडणवीस यांच्या सरकारमुळे. सुनक यांनाच पंतप्रधानपदी नेमून भारतावरील लादलेल्या गुलामीचे प्रायश्चित्त घ्यावे असे एक पत्र महाराष्ट्रातून मिंधे-फडणवीसांना लिहिले गेले. ते पत्र रातोरात मुंबईतील ब्रिटन उच्चायुक्तांच्या कार्यालयात पोहोचवून त्याच्या अंमलबजावणीच्या जबाबदारीचे वाटप झाले. आपण ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बसावे, यासाठी महाराष्ट्रात पडद्यामागे काय काय हालचाली झाल्या याची त्या सुनक साहेबांना कल्पनाही नसेल, असं म्हणत अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलाच वार केला आहे

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.