Uddhav Thackeray | “‘पुणे तेथे काय उणे’ असं मिरविणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’चा…”, उद्धव ठाकरेंनी केली भाजपची थट्टा

Uddhav Thackeray | मुंबई : दोन दिवसांपुर्वी पुण्यात तुफान पाऊस झाला. या पावसाने पुणे शहरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झआलं, लोकांची इतकी तारांबळ उडाली की लोकांच्या झोप मोड झाल्या, अनेकांच्या गाड्या देखील वाहून गेल्या. पुणे सारख्या स्मार्ट सिटीमध्ये पावसामुळे इतकं नुकसान झाल्यावरुन विरोधकांनी सत्ताधारकांवर विशेषतः भाजप पक्षाला धारेवर धरलं आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप (BJP) पक्षाची थट्ट उडावली आहे.

‘पुणे तेथे काय उणे’ असं अभिमानाने मिरविणाऱ्या या ‘स्मार्ट सिटी’चा एवढा ‘पाण’उतारा आधी कधीच झाला नाही, ‘पुण्यात राहतोय की पाण्यात’ या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या ‘विनोदा’ने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला टांगली, हा पाण उतारा महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला नाही, तर बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या पुण्यात आधीच वाहतूककोंडीने कहर झाला आहे. साधे पाच-सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड-दोन तास लागावे यासारखा ‘विकास’ कोणत्याही शहराच्या नशिबी येऊ नये. हे ‘स्मार्ट सिटी’ पुण्यात घडले. पुणे बदलतंय की पुणे तरंगतंय, असा प्रश्न आज जगाला पडला आहे, असं टोला उद्धव ठाकरेंना भाजपला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर –

दरम्यान, भाजपवर टीका करणाऱ्या विरोधकांना, पाऊस पुणे महानगरपालिकेला विचारून किती पडायचं हे ठरवत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.