Uddhav Thackeray | “फडणवीसांनी घोडा सजवला स्वतःसाठी, पण…”; बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन शिवसेनेची बोचरी टीका

Uddhav Thackeray | मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना मोठं विधान केलं. “मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असं ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे गटाने  शिवसेनेचे मुखपत्र असेलेल्या ‘सामाना’तून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना टोला लगावला आहे.

काय म्हंटलंय सामनात?

“भारतीय जनता पक्षाच्या मनातली वेदना अचानक उसळून ओठावर येते. ‘मी प्रदेश अध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत,’ अशी इच्छा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. बावनकुळे हे फडणवीस पुरस्कृत पक्षाध्यक्ष आहेत. दुसरे असे की, इतके मोठे विधान बावनकुळे स्वतःच्या मनमर्जीने करणार नाहीत. त्यामुळे फडणवीस यांच्या मनातली इच्छा बावनकुळेंच्या मुखातून बाहेर पडली असे मानायला जागा आहे,” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे.

“चंद्रकांत पाटील यांनीही चार महिन्यांपूर्वी वेगळे काय सांगितले होते? ‘शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले.’ हे पाटील यांचे विधान व आताचे बावनकुळ्यांचे बोलणे लक्षवेधी आहे. भाजपच्या मनावरील दगड बाजूला करण्याचे काम सुरू झालेले दिसते व फडणवीस त्या कामी कामाला लागले आहेत. हा दगड छाताडावर ठेवून किती काळ काम करायचे? हा प्रश्न भाजप परिवारासही पडलाच आहे,” असं देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय.

“फडणवीसांनी शिंदे गटाच्या हाताखाली काम करणे म्हणजे सिंहाने कोल्ह्यांच्या झुंडीचे ‘राज्यपद’ मान्य करण्यासारखे आहे. याची टोचणी फडणवीस यांच्या मनास असणारच. दुसरे असे की, शिंदेंबरोबर ५० लोक गेले हा भ्रम आहे. त्यांच्याबरोबर फार तर सात-आठच आमदार गेले. बाकीच्यांना फडणवीस यांनीच फितवून, धमकावून पाठवले असे म्हणतात. त्या कामी केंद्रीय तपास यंत्रणा, प्रलोभने, खोके वगैरेंचा वापर झाला. फडणवीस यांनी घोडा सजवला स्वतःसाठी, पण घोड्यावर टपकन जाऊन बसले दुसरेच कोणी!,” असा खोचक टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.