Uddhav Thackeray | “भाजपच्या मेहरबानीवर एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद टिकून आहे”

Uddhav Thackeray | मुंबई : आपल्या सर्वांनाच माहित आहे की, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ठाकरे गट असे दोन गट तयार झाले आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सतत आरोप, टीका करत असतात. तसेच राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिने झाले आहेत. मंत्रीपदाचा विस्तारही झाला आहे. परंतू पोलिस खातांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सामना (Saamana) अग्रलेखातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सामनामध्ये काय लिहिले आहे (Uddhav Thackeray)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे हे पोलीस खात्याच्या बदल्यांवरून नाराज झाले व सातारा येथील आपल्या गावी निघून गेल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले. ते तितकेसे खरे वाटत नाही. मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले असले तरी श्री. फडणवीस यांना ठोकरून, थोडे रुसून गावी जाऊन बसतील अशी स्थिती नाही. कारण भारतीय जनता पक्षाच्या मेहेरबानीवर त्यांचे मुख्यमंत्रीपद टिकून आहे व शिंदे यांचे राजकीय अस्तित्व त्या मुख्यमंत्रीपदावरच टिकून आहे. त्यामुळे भाजप श्री. शिंदे यांना गुदगुल्या करीत मारेल, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर सामनामधून उद्धव ठाकरे गटाने हल्ला केला आहे. परंतू मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण भारतीय जनता पक्षाने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले आहे. सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेतात व मुख्यमंत्री शिंदे ते निर्णय जाहीर करतात.

महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, “शिंदे यांचा रामदास आठवले होईल.” असं त्यांनी सांगितले.

तसेच, एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, “शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील.” असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नसल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.