Uddhav Thackeray | “भाजपला गल्लीतलं कुत्र विचारत नाही”; उध्दव ठाकरेंची भाजपवर बोचरी टीका

Uddhav Thackeray | रत्नागिरी : राजकारणात काय घडेल काय बिघडेल हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसतात हे फार काही नवीन नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरेंनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे रविवारी काल (५ मार्च) या दिवशी जाहीर सभा घेतली. या सभेत ठाकरेंनी विरोधक आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे.

“भाजपला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं”

“शिवसेना फोडणारे मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या एकजुटीवर घाव घालत आहेत. हिंदुत्वासाठी शिवसेना प्रमुखांनी आयुष्य वेचलं. यांना कोण विचारत होते, भाजपला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं.” असे उध्दव ठाकरेंनी भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

“चुना लागाओ आयोग” (Uddhav Thackeray Criticize Election Commission)

“मला निवडणूक आयोगाला विचारायचं आहे की, कोणती शिवसेना खरी आहे हे पहायला इकडं या. हा ‘चुना लागाओ आयोग’ आहे. वरून जे आदेश येतात त्याप्रमाणे वागणारे हे गुलाम आहेत. हे निवडणूक आयोगाच्या लायकीचे नाहीत असे उघडपणे बोलतो मी”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली”

“निवडणूक आयोगाने या तत्त्वानुसार शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचे सांगितलं आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगानं केली नाही, तर माझ्या वडिलांनी केली आहे. कदाचित ते आयोगाचे वडील असतील, माझे नाही,” असे म्हणत उध्दव ठाकरेंनी आयोगावर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.