Uddhav Thackeray | “महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर होतोय”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
Uddhav Thackeray | मुंबई : महाविकास आघाडी बैठक पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप (BJP) पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीतील अन्य नेते यावेळी उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी आणि कटकारस्थान करून पाडले. हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याचा निकाल लागायचा आहे. पण, ते अस्त्वितात आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्याने होणारी अवहेलना, अपमान आणि फुटीरतेची बीजं टाकण्यात येत असल्याचं ठाकरे म्हणाले.
काही गाव कर्नाटकात, तेलंगणा आणि गुजरातमध्ये जायचं म्हणत आहेत. हे आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. छत्रपतींचा एकसंघ महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर होतोय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
तसेच, कर्नाटक सरकार आक्रमकपणे महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहे. अक्कलकोट, सोलापूर आणि मग पंढरपूरच्या विठोबावर सुद्धा ते हक्क सांगतील. त्यामुळे आपल्या राज्यात सरकार आहे का नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे, असं देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Gujarat Election | गुजरात निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात ‘इतके’ टक्के मतदान, निकालाकडे लक्ष
- Shivendrasinhraje Bhosale | “महाराष्ट्रात व साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा…”; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंना सल्ला
- Prataprao Jadhav | प्रसाद लाड यांचे वाक्य मी आक्षेपार्ह मानत नाही – प्रतापराव जाधव
- Eknath Shinde | “आम्हाला कोणी…”, कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे आक्रमक
- Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरे ओवेसींसोबत देखील युती करु शकतात – चंद्रशेखर बावनकुळे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.