Uddhav Thackeray | “माझी लढाई जनतेसाठी”; सत्ता संघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांवर सोपवला असला तरी पक्षादेश आमचाच राहील. त्याचबरोबर अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती मी करणार आहे. कारण माझी लढाई सत्तेसाठी नाही तर माझी लढाई जनतेसाठी आणि देशासाठी आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, “मी राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो. जसा मी राजीनामा दिला होता तसा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही द्यावा आणि निवडणूक लढवण्यासाठी मैदानात यावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

“राज्यपालांवर कारवाई केली गेली पाहिजे. निवडणूक आयोग म्हणजे ब्रह्मदेव नाही. त्याचबरोबर शिवसेना स्थापन करताना आम्ही आयोगाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे ते आमच्या शिवसेनेचे नाव काढून घेऊ शकत नाही”, असं देखील ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.