Uddhav Thackeray | मातोश्रीवर खलबतं! गौतम अदानी नंतर अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Uddhav Thackeray | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल दिपोत्सव आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. एकीकडे फडणवीस, शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर दुसरीकडे मातोश्रीवर मोठी घडामोड घडली. देशातील बड्या उद्योगपतीचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांचा पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना भेटायला गेला.

काल रात्री 8 वाजून 20 मिनिटानी अनंत अंबानी मातोश्री वर दाखल झाले. तब्बल तीन तासांच्या चर्चेनंतर रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अंबानी मातोश्रीवरुन बाहेर पडले. या चर्चेला आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनंत अंबानी यांच्या नेमकी काय चर्चा झाली हे आजूनही गुलदसत्यात आहे.

काही दिवसांपुर्वीच राज्यातील सत्तासंघर्षानंतर गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यात आता अनंत अंबानी सुद्धा ‘मातोश्री’वर दाखल झाले होते. या दोन्ही भेटीचा तपशील समोर आला नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलेलं आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी या दोघांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ही भेट साधारण तासभर चालली असून मध्यरात्र उलटल्यानंतर मुकेश अंबानी मुलासह वर्षा बंगल्यातून बाहेर पडले होते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.