Uddhav Thackeray | “मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देणार…” ; उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी
Uddhav Thackeray | नागपूर : उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत रविवारी रात्री नागपुरात पोहोचले. आज उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ताशेरे ओढले. उद्धव ठाकरे यांनी सभागृहात कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत सीमावादाचा प्रश्न उपस्थित करणार का?, असा सवाल ठाकरे यांची उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाल, “मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देणार आहे. विरोधी पक्षात आल्यावर पेन ड्राईव्ह द्यावे लागतात. या पेन ड्राईव्हमध्ये सत्तरीच्या दशकात महाराष्ट्र सरकारने ‘केस फॉर जस्टिस’ ही फिल्म केली होती. 18व्या शतकापासून कर्नाटकात लोक मराठी भाषा कसे वापरत आहेत. शाळा, कामकाज, संस्था यांचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये आहे.”
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. “काही जण म्हणतात की तुम्ही आम्हाला सीमा प्रश्नाबाबत काय सांगता? आम्ही या लढ्यात काठ्या खाल्ल्या आहेत. पण तुम्ही जेव्हा या लढ्यात काठ्या खल्ल्या तेव्हा तुम्ही शिवसेनेमध्ये होतात. आता पक्षा बदलला तर शांत बसायचं असा त्याचा अर्थ होत नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Winter Session 2022 | सीमावादाचा ठराव सभागृहात का मांडला जात नाही?, अजित पवार संतापले
- Weight Loss Tips | वजन कमी करण्यासाठी ‘या’ फळांचा ज्युसचे करा सेवन
- Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचा सवाल! म्हणाले, “सीमावादाचा प्रश्न उपस्थित करणार का?”
- Shahid Afridi | ‘या’ माजी खेळाडूने शाहीद आफ्रिदीचा फोटो शेअर करत उडवली खिल्ली
- Electric Scooter Launch | यावर्षी लाँच झाल्या आहेत ‘या’ बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.