Uddhav Thackeray | “मुंबईतील मोर्चा म्हणजे ईव्हीएमची कलाकारी नव्हती”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेनेचा पलटवार

Uddhav Thackeray | मुंबई : दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर टीका करत खिल्ली उडवली होती. हा मोर्चा नॅनो मोर्चा असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. दरम्यान, भाजपाच्या टीकेला उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेचे मुखपत्र असेलेल्या ‘सामाना’तून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

नेमकं काय म्हंटलंय सामनात?

“शिवसेनेसह महाविकास विकास आघाडीचा धडक मोर्चा शनिवारी मुंबईत निघाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो महाराष्ट्रप्रेमी ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देत मुंबईच्या रस्त्यावर उतरले. मात्र,देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मोर्चा फेल गेला. अपयशी ठरला. हा महामोर्चा नव्हे; हा तर नॅनो मोर्चा होता, मुळात ज्यांना या मोर्चाचे भव्य स्वरूप दिसले नाही, त्यांच्या डोळ्य़ांत ‘मराठी द्वेषा’चा वडस वाढला आहे, असेच म्हणायला हवे. शनिवारचा मुंबईतील भव्य मोर्चा म्हणजे निवडणुका जिंकणारी ईव्हीएमची कलाकारी नव्हती”, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.

“मुंबईतला शनिवारचा महामोर्चा टोकदार आणि धारदार होता. हा मोर्चा निघू नये म्हणून ‘गुंगाराम’ सरकारने नाना खटपटी, लटपटी केल्या. या बेकायदा सरकारने नियम, कायद्याचे, अटी–शर्तींचे कागदी भेंडोळे नाचवले. तरीही महामोर्चा निघालाच. या पुढेही आंदोलनाच्या तोफा धडधडतच राहतील. नापास, बेकायदा सरकार काय म्हणते आहे, याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मोर्चा यशस्वी झाला. याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे फडणवीस यांनी तळमळून सांगितले की, मोर्चा फेल झाला! याचाच अर्थ मोर्चा भव्य होता. हा मोर्चा यशस्वी झाल्याने सरकार टरकले आहे. या मोर्चाने मिंधे–फडणवीस सरकारला नोटीस दिली आहे. तुमचा बेकायदा इमला कोसळत आहे”, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

ते म्हणाले, “तीन पक्ष एकत्र येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला. आज तुम्ही कुणीही ड्रोन शॉट नाही दाखवू शकलात. आज क्लोज अप दाखवावे लागले. कारण ड्रोन शॉट लायक मोर्चाचं नव्हता. आम्ही त्यांना विनंती केली होती की, आझाद मैदानावर या. पण, आझाद मैदानाएवढी संख्या राहणार नाही हे माहीत असल्यामुळं जिथं रस्ता लहान होतो, अशी जागा त्यांनी निवडली.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.