Uddhav Thackeray | “मोदींना लहर आली म्हणून दोन हजार रुपयाची नोट..”; ठाकरे गटाचं मोदींवर टीकास्त्र

Uddhav Thackeray | मुंबई: भारतीय रिझर्व बँकेने दोन हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोदी सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. नोटबंदीचा निर्णय राजकीय असून दोन हजारांची नोटबंदी ही लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली घंटा आहे, अशी टीका ठाकरे गटाने सामना अग्रलेखाचे माध्यमातून केली आहे.

सामना अग्रलेखाच्या (Samana Editorial) माध्यमातून मोदी सरकारवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे. “मोदी सरकार भारतीय अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा करत आहे. पहिल्या नोटबंदीचा खटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः वृत्तवाहिन्यांवर येऊन दिला होता. पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर हाहाकार उडाला होता. नोटबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा जास्तच वाढला आहे. नोटबंदीमुळे दहशतवाद्यांना होणारा अर्थ पुरवठा थांबेल, असा दावा मोदी सरकारने केला होता. मात्र, प्रत्यक्षात उलटेच झाले आहे.”

“मोदींना लहर आली म्हणून दोन हजाराची नोट बंद केली. हा निर्णय भारतीय रिझर्व बँकेने जाहीर केला आहे. आपल्या देशातील न्यायालय, घटनात्मक संस्था, निवडणूक आयोग स्वातंत्र आणि निपक्ष राहिले नाही. दोन हजार रुपयांची नोट बंद करणे हा पूर्णपणे राजकीय निर्णय आहे”, असं देखील या अग्रलेखात (Samana Editorial) म्हटलं आहे.

“दोन हजारांची नोट बंद करून मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेची कंबर तोडत आहेत कारण मणिपूरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत दहशतवादाची कंबर अजिबात तुटलेली नाही. हिंसाचार व दहशतवाद सुरूच आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्डयात घालण्याचा चंगच मोदी यांनी बांधलेला दिसतोय 2016 च्या घातकी नोटाबंदीनंतर दोन हजारांच्या नोटांच्या छपाईसाठी कोटयवधींचा खर्च झाला. तो सर्व खर्च पाण्यात गेला”, असं अग्रलेखामध्ये (Samana Editorial) नमूद करण्यात आलं आहे.

वाचा सामना अग्रलेख (Read Samana Editorial)

भारतीय अर्थव्यवस्थेचा जो खेळखंडोबा सुरू आहे, त्यास इतिहासात तोड नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून तडकाफडकी बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या नोटाबंदीचा खटका पंतप्रधान मोदी यांनी स्वतः वृत्तबाहिन्यांवर येऊन दाबला पाचशे आणि एक हजारच्या नोटा त्यांनी चलनातून बाद केल्या व एकच हाहाकार उडाला. मोदी रात्री आठ वाजता टीव्हीवर प्रकट झाले व दुसऱया दिवसापासून त्यांनी संपूर्ण देशाला ‘नोटा’ बदलण्यासाठी बँकाच्या रांगेत उभे केले. त्या रांगेत देशभरात चार हजारांवर माणसे मरण पावली व नोटाबंदीचा काडीचाही फायदा झाला नाही उलट लहान उद्योग, छोटे व्यापारी देशोधडीस लागले नोकरया गेल्या काळा पैसा बाहेर येईल, असे मोदी म्हणाले. उलट काळा पैसा जास्तच वाढला दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा नोटाबंदीमुळे थांबेल असा त्यांचा दावा होता. प्रत्यक्षात उलटेच झाले मोदींनी हजाराची नोट चलनातून बाद केली व दोन हजारांची गुलाबी नोट आणली त्यामुळे हजार पाचशेत होणारी लाचखोरी दोन हजारांच्या नोटेत पोहोचली, हेच नोटाबंदीचे फायदे. आता मोदींनी ‘लहर’ आली म्हणून दोन हजारांची नोटही बाद केली हा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केला आपल्या देशातील न्यायालये, घटनात्मक संस्था, निवडणूक आयोग जेथे स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिले नाहीत,

“भारताची रिझर्व्ह बँक

दोन हजारांच्या नोटांबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकेल काय? दोन हजारांच्या नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे. पहिल्या नोटाबंदीच्या वेळी ज्या उदात्त भावनेने नोटाबंदी लादली, तोच प्रकार आता आहे विरोधी पक्षांकडे 2024 च्या दृष्टीने थोडेबहुत दोन हजारांच्या नोटाचे चलन राखून ठेवले असेल तर ते बाद व्हावे व विरोधी पक्ष त्यादृष्टीने अडचणीत यावा यापेक्षा दुसरा हेतू असू शकत नाही कर्नाटकच्या निवडणुकीत सत्ताधाऱयांकडून दोन हजारांच्या गुलाबी नोटांचा अफाट वापर झाला, पण दोन हजाराची मात्रा चालली नाही त्या चिडीतूनही दोन हजारांची नोट बाद’ असा निर्णय झालेला असू शकतो दोन हजारांची नोटाबंदी ही लोकसभा निवडणुकांची पहिली घंटा आहे. देशाच्या चलनात दोन हजारांच्या नोटा किती आहेत व लोकांनी त्यातील किती दडवून ठेवल्या आहेत? हे एक रहस्य आहे. या सर्व नोटा सप्टेंबरपर्यंत बाहेर काढायच्या आहेत. बँकेत एकावेळी फक्त 20 हजारांपर्यंतच या गुलाबी नोटा जमा करता येतील मोदी यांचे अंध भक्त म्हणजे एक अजबच रसायन म्हणावे लागेल एक हजाराची नोट बाद करून दोन हजारांची नोट चालू करणे हा एक मास्टर स्ट्रोक होता व आता दोन हजारांची नोट अचानक बंद करणे हासुद्धा अंध भक्तांसाठी मोदींचा मास्टर स्ट्रोकच आहे असे ढोंग व दुटप्पीपणा फक्त हे अंध भक्तच करू शकतात.

दहशतवादाची कंबर

तोडणार होते व आता तीच दोन हजारांची नोट बंद करून मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेची कंबर तोडत आहेत कारण मणिपूरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत दहशतवादाची कंबर अजिबात तुटलेली नाही. हिंसाचार व दहशतवाद सुरूच आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्डयात घालण्याचा चंगच मोदी यांनी बांधलेला दिसतोय 2016 च्या घातकी नोटाबंदीनंतर दोन हजारांच्या नोटांच्या छपाईसाठी कोटयवधींचा खर्च झाला. तो सर्व खर्च पाण्यात गेला. नोटा दोन हजारांच्या छापा नाहीतर पाच हजारांच्या, त्याने काय फरक पडतोय? डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांक पातळीवर कोसळला आहे. 85 रुपये एका डॉलरला ही स्थिती आहे. 10 वर्षांपूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना डॉलरची किंमत 45 रुपये होती, आज 85 रुपये झाली. ही आपली आर्थिक महासत्ता’ मोदी अर्थव्यवस्थेशी निर्घृणपणे खेळत आहेत, हे गौतम अदानी प्रकरणातही दिसले देशातील सर्व सार्वजनिक उपक्रम मोदींनी अदानी यांच्या खिशात टाकले विमानतळांपासून बंदरापर्यंत सर्व राष्ट्रीय संपत्ती आज गौतम अदानींची झाली सार्वजनिक बँकांचा, एलआयसीसारख्या उपक्रमांचा पैसाही त्यानी अदानींसारख्या मित्रांना दिला आपण राष्ट्रीय संपत्तीचे मालक नसून विश्वस्त आहोत याचा विसर त्यांना पडला आहे… पंतप्रधानांची आज सामान्य जनतेत प्रतिष्ठा राहिलेली नाही सर्व राष्ट्रीय कामे बाजूला ठेवून पंतप्रधान कर्नाटकच्या निवडणुका सभा व रोड शो घेतात व शेवटी त्यांचा पराभव होतो. त्या पराभवाची चर्चा कमी करण्यासाठी एका रात्रीत दोन हजारांची नोटाबंदी जाहीर केली जाते, पण त्यांच्या निर्णयाने यावेळी ना खळबळ माजली ना सळसळ झाली 50 खोकेवाल्यांच्या दुखात मात्र सहभागी व्हावे लागेल त्यांना खोक्यात गुलाबी धनच मिळाले असेल त्यांची धावपळ समजून घ्यावी लागेल इतकेच

सौजन्य-सामना

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3ol5TwS