Uddhav Thackeray | या महाराष्ट्र द्रोह्यांना बाहेर काढले पाहिजे ; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे भाजप बॅकफूटवर आली आहे. या दोघांच्या वक्तव्यावर भाजपचे बहुतांश नेते मौन बाळगून आहेत. या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आक्रमक झाले आहेत.  दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या दोघांचीही पाठराखण केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षियांना यांच्याविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भाजपमधी महाराष्ट्रप्रेमींना देखील विनंती केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्यामागे कोणाचा तरी मेंदू असावा, यापूर्वी देखील त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या महापुरुषांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे. महाराष्ट्रात मिंधे सरकार, खोके सरकार आल्यापासून राज्याची अहवेलना होत आहे. कोणीही यावं टपलीत माराव हे बस झालं. राज्यात छत्रपतींचा झाला आणि ज्या पक्षाने केला त्यांचे नेते गुळमुळीत उत्तर देत आहे. या महाराष्ट्र द्रोह्याला बाहेर काढले पाहिजे. हे चाळे बंद करा. ह्या माणसाला परत पाठवा नाहीतर आम्हाला आंदोलन करावे लागेल”

“या सडक्या मेंदू मागे कोण आहेत? हे महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळत आहे. राज्यपाल नियुक्तीचे निकष ठरवले पाहिजे. ते निष्पक्ष असेल पाहिजे. राज्यपाल आहेत म्हणून काहीही बोलावे, असं चालणार नाही. ते स्वीकारले देखील जाणार नाही. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जुना आदर्श म्हणून अपमान केला”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.