Uddhav Thackeray | रिफायनरीला उद्धव ठाकरेंचा विरोध, म्हणाले…

Uddhav Thackeray | सोलगाव: उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यावर ठाकरेंनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करत लोकांशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरीला विरोध केला आहे. लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

“मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याची योजना आखली जात आहे. रिफायनरीचं समर्थन करून दाखवा असं”, आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजकर्त्यांना केलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, “आमचा एअर बस आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणा आणि रिफायनरी गुजरातला घेऊन जा. चांगले प्रकल्प गुजरातला आणि वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्रात हे चालणार नाही.” “हुकूमशाहीचा विचार केला तर आम्ही हुकूमशाही मोडून काढू”, असा इशारा देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे.

“33 देशांमध्ये मुख्यमंत्र्यांची गद्दार म्हणून ओळख झाली आहे. महाराष्ट्रातील तीन जिल्हे देखील या गद्दारांना ओळखत नव्हते. समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना शेतकऱ्यांच्या फळबागा नष्ट केल्या जात होत्या, त्याबाबतीत मी तिथे जाऊन मार्ग काढला”, असं देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.