Uddhav Thackeray | “लांडगे विकले गेले, त्यांचा भाव सर्वांना माहितीच आहे”; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray | मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या आमदारांवर सडकून टीका केली आहे.
“सध्याचे राजकारण गलिच्छ झाले आहे. महाराष्ट्रातील बंडाळीमुळे देशभरात बदनामी झाली. लांडगे विकले गेले, त्यांचा भाव काय होता, हे सर्वांना माहिती आहे. निष्ठावंत निखारे शिवसेनेसोबत आहेत. उद्या याच निखाऱ्यांच्या मशाली होतील” असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार राजन विचार यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच ठाणे दौरा होता.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“मी इथे भाषण करायला उभा नाही, मात्र लवकरच भाषण करायला येणार आहे. आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलो आहे. येत्या काही दिवसात ठाणेकरांच्या राजकीय आरोग्यासाठी मी इथे येणार आहे. सध्या राजकारणात विकृतपणा आणि गलिच्छपणा आलेला आहे. तो समोर दिसत असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही याचा अभिमान आहे.”
“अन्यायाला लाथ मारायची आहेच, पण 80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आपण विसरलेलो नाही. राजन विचारे त्यांचे शिलेदार निष्ठावंत शिवसैनिक इथे आहेत. बाकी विकाऊ होते ते विकले गेले, त्यांचा भाव सांगण्याची गरज नाही.”
“80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची शिकवण आहे. अस्सल निष्ठावंत सैनिक इथे आहे. बाकी काय भावाने विकले गेले ते तुम्हाला माहित आहेत. 50 खोके ही घोषणा काश्मीरपर्यंत पोहोचली आहे. संजय राऊत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत गेले होते. तिथेही 50 खोके या घोषणा दिसत होत्या. नाही म्हटलं तरी महाराष्ट्राची बदनामी आहे. जे गेले ते जाऊद्या. पण जे अस्सल शिवसैनिक शिवसेना आणि माझ्यासोबत राहिले. हे जे निखारे आहेत तेच उद्या मशाल पेटवणार आहेत. मी मुख्यमंत्री असताना विचित्र जबाबदारी आली होती, जागतिक संकट आले होते, त्यावेळी तुम्ही जे सहकार्य केले विशेषतः डॉक्टरांनी ते मोठं होतं”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | “पहाटेचा ‘तो’ शपथविधी राजकीय खेळी असू शकते, राष्ट्रपती राजवट…”-जयंत पाटील
- BJP | “उद्धव ठाकरे वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत का?”; भाजपच्या ‘या’ नेत्याचा सवाल
- Gopichand Padlkar | “मिरजेतील जागा आमचीच, अतिक्रमण केलं तर…”; तहसीलदारांच्या निकालानंतर पडळकरांचा इशारा
- Amol Mitkari | “प्रकाश आंबेडकरांच्या बोलण्यामागे मास्टरमाईंड कोण?”; अमोल मिटकरींचा परखड सवाल
- Eknath Shinde | “लोकशाहीत प्रत्येकाला…”; उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Comments are closed.