Uddhav Thackeray | वज्रमुठ सभा का थांबवल्या? उद्धव ठाकरेंनी सांगितलं या मागचं कारण

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी वज्रमुठ सभा का थांबवल्या? याचं कारण सांगितलं आहे. कारण भाजप विरोधात महाविकास आघाडीने वज्रमुठ सभाच्या माध्यमातून आघाडी घेतली. या सभा अचानक रद्द केल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यामुळे या सभा रद्द करण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राजकीय वर्तुळात याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वज्रमुठ सभा का रद्द करण्यात आल्या? याचं नेमकं कारण आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

वज्रमुठ सभा का थांबवल्या? Why was the Vajramut Sabha stopped?

पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “वज्रमुठ सभा या मे महिना आणि जूनच्या सुरुवातीपर्यंत घेण्याचं नियोजन आखलं होतं. यासाठी मी पुढाकार घेतला होता. या सभा संध्याकाळी जरी घेतल्या जात असल्या तरी लोक दुपारपासूनच यासाठी हजर असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे काही घडलं, त्या पार्श्वभूमीवर सभा रद्द करण्यात आल्या आहेत.” उन्हामुळे या सभा रद्द करण्यात आल्या असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “महाविकास आघाडीला तडा जाईल असे मी काहीही बोलणार नाही, मला व्यक्तीचा नाही तर वृत्तीचा पराभव करायचा आहे. त्याचबरोबर हुकूमशाहीला हरवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे मी माझ्या मतांवर ठाम आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.