Uddhav Thackeray | “शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचे संबंध…”; उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले

Uddhav Thackeray | मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावरु राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ही युती फक्त शिवसेनेसोबतच आहे का? प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेणार का? राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील संबंध सुधारतील का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. “प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यास काहीच अडचण नाही”, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे.

“सामंजस्याचे राजकारण कोणी करणार नसेल तर एकत्र येण्याचे नाटक कोणी करू नये. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत येतील. वंचितला महाविकास आघाडीत येण्यास कुणाचाही विरोध नाही. वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी आमची चर्चा होईल”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

“शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊच शकत नाही. शरद पवार दगा देतील, असं त्यावेळी सांगितलं गेलं. पण आमच्याच लोकांनी दगा दिला. दुसऱ्याचं घर फोडून स्वतचं घर सजवण्याचं काम सुरू आहे. ही औलाद गाडण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed.