Uddhav Thackeray | “शिवसेना आयोगाच्या नाही, तर माझ्या वडिलांनी सुरू केली”; ठाकरेंची निवडणूक आयोगावर जहरी टीका
Uddhav Thackeray | रत्नागिरी : राजकीय क्षेत्रात विरोधीपक्ष हे सात्ताधारी पक्षावर तर सत्ताधारी पक्ष हे विरोधी पक्षावर टीका टिप्पणी करत असतात. हे फार काही नवीन नाही. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटात नाव आणि चिन्ह यावरून वाद सुरू होता. त्या वादावरून निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगावर ठाकरे गटाचे प्रमुख ठाकरे संतापले आहेत. काल (५ मार्च) या दिवशी रत्नागिरीतील खेड येथे त्यांनी सभेत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यावरून आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? (Uddhav Thackeray Statement)
“निवडणूक आयोगाने शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचे तत्व खोटे आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केली नाही, तर ती माझ्या वडिलांनी केली आहे. तिकडे निवडणूक आयोगाचे वडील बसले असतील, मात्र माझे नाही.” अशी शाब्दिक टीका उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केला आहे.
“त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर खरी शिवसेना कोणती हे…”
“मला निवडणूक आयोगाला खास सांगायचे आहे की, त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर खरी शिवसेना कोणती हे पहायला इकडे या. हा ‘चुनाव लगाओ आयोग’ आहे. हे सत्याचे गुलाम आहेत. वरून जे आदेश येतात त्यानुसार हे वागणारे आहेत. हे निवडणूक आयोग म्हणण्याच्या लायकीचे नाहीत” अशी बोचरी ठाकरे यांनी केली आहे. यावर आता भाजप पक्षातून काय प्रतिक्रिया उमटतील याकडे राज्याचं लक्ष लागले आहे.
“निवडणूक आयोगाने शेण खाल्लं”
ज्या दिवशी निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. अशावेळी उद्धव ठाकरेंनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. अशावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने शेण खाल्लं अशी टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकशाहीची हत्याच होणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून लोकशाहीला आदरांजली वहावी आणि आम्ही बेबंदशाही देशात सुरू करतो आहोत हे जाहीर करावं”
Uddhav Thackeray criticize Eknath Shinde Group
“मी कुठेही खचलो नाही. कुठेही खचणार नाही. माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. ही ताकद जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत असे कितीजरी चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी त्यांना गाडून त्यांच्या छातीवर शिवरायांचा भगवा फडकवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे,” असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Ramdas Kadam | “जगाच्या इतिहासात बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री अन् नेता बाहेर…”; कदमांची जहरी टीका
- Sanjay Shirsat | “इम्तियाज ही औरंगजेबाची औलाद, आमच्या छातीवर नाचाल तर…”; संजय शिरसाट आक्रमक
- Radhakrishna Vikhe Patil | “उद्धव ठाकरे हे संधीसाधू, ते स्वत: भाजपच्या मदतीने निवडून आले”; विखे पाटलांची टीका
- Bacchu Kadu | “आम्हालाही मुख्यमंत्री व्हायचंय”; बच्चू कडूंनी जाहीर सभेत बोलून दाखवली इच्छा
- Gulabrao Patil | “बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील आहेत मान्यय पण…”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर गुलाबरांचं वक्तव्य
Comments are closed.