Uddhav Thackeray | शिवसेना मजबूत आहे आणि ती आणखी मजबूत होईल – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray | नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये दाखल होताच उद्धव ठाकरे यांनी काल पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक घेतली. कोरोना काळानंतर पहिल्यांदा नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळाच्या नवीन कार्यलयात भेट दिली.

यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची आस्तेने चौकशी केली. कोरोनामुळे अडीच वर्ष हिवाळी अधिवेशन झाले नव्हते. त्यामुळे अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेना निष्ठावंतांची आहे. त्या निष्ठेवर शिवसेना आणखी मजबूत होईल.

हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला सामना बघायला मिळू शकतो. शिवसेनेत मोठा बंड केल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे शाब्दिक हल्लाबोल देखील होऊ शकतो.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांची मिटींग बोलावली आहे. या मिटींगमध्ये उद्धव ठाकरे आमदारांना कानमंत्र देण्याची शक्यता आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न, भाजप नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान, हे मुद्दे शिवसेना आमदार उपस्थित करु शकतात.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.