Uddhav Thackeray | “संतोष बांगर चौथी नापास थोतांड माणूस, त्यांनी…” ; ठाकरे गटाकडून जोरदार समाचार

Uddhav Thackeray | पुणे : रोज उठून बोम्मई महाराष्ट्राच्या कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर बोलताना शिंदे गटाचे नेते संतोष बांगर (Santosh Bangar) यांची जीभ घसरली.

“संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा आहेत, त्यांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही”, असा इशारा संतोष बांगर यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरे गटाच्या पुणे युवा सेनेच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

त्या म्हणाल्या , “संतोष बांगर हा चौथी पास थोतांड माणूस आहे. तो फक्त बोलू शकतो. काहीही करू शकत नाही.” हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी माझ्यासमोर येऊन दाखवावे, असं ओपन चॅलेंज अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांनी दिलंय.

संतोष बांगर यांचं वक्तव्य काय?

“संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा आहेत”, असं संतोष बांगर म्हणाले आहेत. “संजय राऊत यांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही”, असा इशाराही संतोष बांगर यांनी दिलाय. पुढे ते म्हणाले, “आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.