Uddhav Thackeray | संतोष बांगर यांची पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ? ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Uddhav Thackeray | मुंबई : हल्ली राज्यात अनेक घडामोडी घडत आहे. यातच एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय बांगर हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत.  मंत्रालयाच्या गेटवर पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप बांगर यांच्यावर केला आहे. सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवल्याने संतोष बांगर (Sanjay Bangar) यांनी पोलीस कर्मचाऱ्याला जाब विचारत शिवीगाळ केल्याचं बोललं जात आहे. परंतू संतोष बांगर यांनी हे आरोप फेटाळले असून, सीसीटीव्ही फूटेज तपासून पाहा असं सांगितलं आहे. यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे गटाचा संतोष बांगरवर निशाणा (Uddhav Thackeray)

संतोष बांगर आणि वाद हे एकत्र नांदणारे आहेत. मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही ते ऐकत नाहीत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

यावर संतोष बांगर यांनी प्रत्युत्तरही दिलं आहे. मला मुख्यमंत्र्यांनी कोणतीही समज दिलेली नसून, त्या सर्व बातम्या चुकीच्या होत्या, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांनी मला अन्यायाविरोधातील लढा देण्याची शिकवण दिली आहे. ते काम मी करत आहे. पण पोलीस कर्मचाऱ्याशी कोणताही वाद घातला नसल्याचं बांगर यांनी सांगितलं.

दरम्यान, संतोष बांगर यांची ही घटना २७ ऑक्टोबरला घडल्याची आहे. त्यावेळी संतोष बांगर आपल्या 15 कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात असताना गेटवर कॉन्स्टेबलने त्यांना अडवलं. पोलीस कर्मचाऱ्याने कार्यकर्त्यांचा पास काढण्यास सांगितल्याने संतोष बांगर संतापले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यासोबत वाद घातला आणि आपल्याला ओळखत नाही का? अशी विचारणा केली. पोलीस कॉन्स्टेबलने यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. परंतू संतोष बांगर यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.