Uddhav Thackeray | “सरकार चालविण्यापासून ते…”, उद्धव ठाकरेंची सरकार चालवण्याची तयारी

Uddhav Thackeray | मुंबई : महाविकास आघाडी बैठक पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सरकार चालवण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. तसेच मविआने सरकार विरोधात महामोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.

काही दिवसांनी कर्नाटकमध्ये निवडणूक होत आहेत. त्याची तयारी सुरु झाली आहे. सीमा भागातील गावे पळविण्याचा घाट कर्नाटकने घातला आहे. आपल्या सरकारमधील काही मंत्री कर्नाटकला जाणार होते. पण तेथील मुख्यमंत्र्यांनी येऊ नका असा इशारा दिल्यावर या नेभळट मंत्र्यांनी आपला दौरा रद्द केला. सरकारने त्या गावांची जबाबदारी घ्यावी. गद्दार सरकारने ते याबाबत काय करणार आहेत ते सांगावे नाही तर सरकार चालविण्यापासून ते बेळगावला जाईपर्यंत सर्व जबाबदारी आम्ही घेतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार गद्दारी आणि कटकारस्थान करून पाडले. हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर याचा निकाल लागायचा आहे. पण, ते अस्त्वितात आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्याने होणारी अवहेलना, अपमान आणि फुटीरतेची बीजं टाकण्यात येत असल्याचं ठाकरे म्हणाले.

काही गाव कर्नाटकात, तेलंगणा आणि गुजरातमध्ये जायचं म्हणत आहेत. हे आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं. छत्रपतींचा एकसंघ महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर होतोय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

तसेच, कर्नाटक सरकार आक्रमकपणे महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगत आहे. अक्कलकोट, सोलापूर आणि मग पंढरपूरच्या विठोबावर सुद्धा ते हक्क सांगतील. त्यामुळे आपल्या राज्यात सरकार आहे का नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.