Uddhav Thackeray | “हा देशातील हुकूमशाहीचा पराभव…”; कर्नाटक निवडणूक निकालावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray | मुंबई: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक निवडणुकीमध्ये हुकूमशाहीचा पराभव झाला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कर्नाटक निवडणूक निकालाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “देशातील हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकच्या विजयाने झाली आहे. सामान्य माणूस हुकुमशहीचा पराभव करू शकतो आणि हा विश्वास कर्नाटकच्या जनतेने देशातील जनसामान्यांना दिला आहे. शहाण्या जनतेचे यासाठी अभिनंदन!”
पुढे बोलताना ते म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी वाट दाखवली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. त्याचबरोबर कर्नाटकच्या जनतेने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या बळजबरी सत्तेचं जोखड फेकून दिलं आहे. प्रियंका गांधी आणि राहुल गांधींचे खास अभिनंदन!”
“कर्नाटकमध्ये भाजपला नाकारण्यात आलं आहे. भाजपचा फोडाफोडीचं राजकारण कर्नाटकमधल्या लोकांना आवडलेलं नाही. कर्नाटकनंतर भाजपला आता आम्ही महाराष्ट्रातून घालवणार आहोत”, असं देखील ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला नेमका कुणाला?
- Karnataka Election Result | कर्नाटक निवडणूक निकालावरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस! पाहा लोकांची क्रिएटिव्हिटी
- Karnataka Election Results । कर्नाटकातील काँग्रेसच्या दमदार विजयावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- Karnataka Election Result | कानडी जनतेनं मोदी- शाहांचं ऐकलं नाही- संजय राऊत
- Prithviraj Chavan | “भाजप पराभव सहन करणार नाही…” ; पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली भीती
Comments are closed.