Uddhav Thackeray | “हा पक्ष आहे का चोरबाजार?”; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात 

Uddhav Thackeray | बुलढाणा : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथी नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. बुलढाण्यातील चिखली मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभा घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याकडे उद्धव ठाकरे गटाचे विशेष लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केलीय.

ते म्हणाले, “आज भाजप भाकड पक्ष झाला आहे, यांच्या पक्षात आयात सुरु आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडून लोकं आयात केली जात आहेत. इथले गद्दार आमदार खासदार आहेत त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही, असं सांगावं. यांना नाव शिवसेनेचं पाहिजे, बाळासाहेबांचं नाव पाहिजे आणि आशीर्वाद नरेंद्र मोदींचे पाहिजेत.”

तुम्हीं यादी काढा यांच्यात यांच्या पक्षाचे किती आणि आयात किती? हा पक्ष आहे की चोरबाजार? स्वत:च काही शिल्लक नाही म्हणून बाहेरुन सगळे घेऊन समोर उभे केलेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “मला भीती वाटते महाराष्ट्रात येणारे उद्योग त्यांनी गुजरातला नेले. तसेच महाराष्ट्रातील हे तुकडे करायला मागे पुढे पाहणार नाही. का तर कर्नाटकाच्या निवडणुका आहे”, असंही ते यावेळी म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, “बुलढाण्यात आलो की जुने चेहरे दिसत नाहीत. मात्र, ते फसवे निघाले आहेत. हे जे मर्द मावळे इथं जमले आहेत. आमचं सरकार व्यवस्थित चाललं होतं, मात्र त्यांनी सरकार पाडलं. नितीन देशमुख परत आले, आज तिकडे सगळे गेले आहेत.” मी शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मी त्वेषानं उभा आहे. पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारचं आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.