Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंचा ‘धनुष्यबाण’ गेला, आता ‘मशाल’ ही अडचणीत; काय आहे प्रकरण?
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह आयोगाकडून गोठवण्यात आले असून दोन्ही गटाला पक्षाच नवं नाव आणि चिन्हं तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र, ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने (Samata Party) दावा ठोकला असून ते आता यासाठी हायकोर्टात जाणार आहेत. यामुळे ठाकरेंसमोर नवीन अडचण निर्माण झाली आहे.
समता पक्षाने ठाकरेंना देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर आक्षेप घेतला आहे. समता पक्ष उद्या म्हणजेच शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे, पण त्यांना हे चिन्ह देऊ नये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह दिल्यामुळे समता पक्षाच्या पाठिंब्याला फटका बसला आहे, असा दावा समता पक्षाकडून करण्यात येत आहे.
समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल (Uday Mandal) यांनी चिन्हाच्या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं, त्या पत्रावर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणतंही उत्तर आलं नाही, त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे. शनिवारी ते कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत. मशाल हे चिन्ह समता पक्षाला आरक्षित करण्यात आलं आहे, तरीही शिवसेनेला हे चिन्ह कसं दिलं गेलं? असा सवाल उदय मंडल यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.
समता पार्टी च्या वतीने या अगोदर निवडणूक आयोगात तक्रार करून मशाल चिन्ह आमच्या पार्टीचं असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचबरोबर निवडणूक आयोगाला आम्ही पक्षाचा पूर्ण खर्च सादर करत आलो असून बिहार विधानसभा पोटनिवडणूकीत दोन जागेवर याच चिन्हावर उमेदवार दिल्याचा दावाही करण्यात आला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने आमचं म्हणणं न ऐकून घेताच ठाकरे गटाला हे चिन्ह दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे आता हायकोर्टात याबाबत काय निर्णय लागतो. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | बाई समजून हलक्यात घेवू नका – सुषमा अंधारे
- Jayant Patil । ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने भष्ट्राचाराचे खोटे आरोप केले; जयंत पाटलांचा दावा
- Kirit somaiya | राजकीय नेत्यांनी अर्धवट ज्ञानाच्या आधारावर…”; मुलाच्या ‘पीएचडी’वर टीका करणाऱ्यांना किरीट सोमय्यांनी सुनावलं
- Health Care Tips | ‘या’ आयुर्वेदिक औषधी वापरून डायबिटीज वर ठेवता येऊ शकते नियंत्रण
- Viral Video | मिश्किलपणे खाऊ खाताना दिसली ‘ही’ खारुताई, पाहा व्हिडिओ
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.