उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड घोटाळा केला, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना धारेवर धरले आहे. शिवसैनिकांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केली होती. त्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले. आज पुन्हा किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर येत असून त्यांचा भाजपाकडून त्याच पायऱ्यावर सत्कार होणार होता.

आज ते पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन पुणे महानगरपालिका आणि संचिती हॉस्पिटल या ठिकाणांना भेट देत आहेत. पुणे पालिकेच्या पायऱ्यांवर भाजप किरीट सोमय्यांचा सत्कार करणार होते. पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष होण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. किरीट सोमय्या हे पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यासाठी आज पुन्हा ते पुणे महानगरापालिकेत जाणार आहेत.

कोरोना काळात राज्य सरकारने भ्रष्टाचार केला असून कोवीड सेंटर्सच्या उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या मदतीने लोकांच्या जीवाशी खेळ मांडला असा आरोप सोमय्यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. ज्या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी ब्लॅक लिस्ट केलं होतं त्या कंपनीला आदित्य ठाकरे यांनी कंत्राट दिलं.

उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड घोटाळा केला आहे त्यामुळे कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. महापालिकेत तक्रार होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी शंभर गुंड पाठवले होते. आता कारवाई कशी करत नाही ते पाहावे लागेल असे सोमय्या म्हणाले. सोमय्यांच्या या गंभीर आरोपानंतर राज्यातील राजकारण आणखीन तापलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा