InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘काँग्रेस-राष्ट्रवादी राजकारणातील थकलेले घोडे’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच दोन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. त्यातच माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून बऱ्याच चर्चा रंगू लागलेल्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धुळ्यातील प्रचार सभेत या विधानावरून काँग्रेसवर लक्ष्य केले.

Related Posts

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

Loading...

- Advertisement -

त्यानंतर आता भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही आजच्या सामनातील अग्रलेखात काँग्रेस-राष्ट्रवादीला थकलेल्या घोड्यांची उपमा दिली आहे. “काँग्रेस पक्ष काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय, सध्याच्या राजकारणातील ‘थकलेले घोडे’च आहेत. त्यांच्या घोडेस्वारांची मांड घट्ट राहिलेली नाही. निवडणुकीच्या शर्यतीत या दोन्ही घोडय़ांवर ‘जॅकपॉट’ लागत नाही हे 2014 पासून वारंवार सिद्ध झाले आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.