‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं नव्हतं मीच त्यांचा हात हातात घेतला आणि वर केला’

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकताही सर्वांना लागून राहिली होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर थेट निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. यावेळी मी नेतृत्व करण्यास तयार नव्हते, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.

यावेळी उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री बनायचं नव्हतं तर का झाले?, असं भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांना उत्तर देत निशाणा साधला आहे. शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असून त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं शरद पवार म्हणाले आहेत. आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता, असंही शरद पवार म्हणाले आहेत. सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनाचा होईल हे सर्वानी एकमताने मान्य केलं होतं. असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा