अखेर ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर; एकनाथ शिंदेकडे तगडी खाती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे गृह आणि नगरविकास ही दोन्ही महत्त्वाची खाती शिवसेनेकडे आली आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नगरविकास खातं असेल. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास आणि जलसंपदा खातं असेल. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल आणि ऊर्जा मंत्रालय असेल.

मागील दोन दिवसांपासून गृह खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिलं अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवलं आहे.

खातेवाटप जाहीर  – 

  • एकनाथ शिंदे- गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम
  • सुभाष देसाई- उद्योग, उच्च-तंत्रशिक्षण, कृषी, परिवहन
  • छगन भुजबळ- ग्रामविकास, जलसंपदा
  • जयंत पाटील- वित्त, गृहनिर्माण, आरोग्य
  • बाळासाहेब थोरात- महसूल, ऊर्जा, वैद्य. शिक्षण
  • नितीन राऊत- सार्व.बांधकाम (उपक्रम सोडून), महिला बालकल्याण

दरम्यान, 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यानंतर डिसेंबरअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.