InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देणार असाल तरच भाजपने फोन करावा’

- Advertisement -

भाजपसोबत सत्तास्थापनेबाबत संघर्ष निर्माण झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे भाजपसह इतरही सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची भूमिका समोर आली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर अजूनही ठाम आहेत. ‘मला स्वतःहून युती तोडायची नाही. भाजपने काय तो निर्णय घ्यावा. लोकसभेवेळी जे ठरलं त्याप्रमाणे व्हावं. भाजप अध्यक्ष अमित शाहा यांच्यासोबत सगळे ठरलं होतं. समसमान वाटप हा फॉर्म्युला होता. युती कायम राहावी हीच इच्छा आहे. मात्र भाजपनं दिलेला शब्द पाळावा. ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देणार असाल तरच भाजपने फोन करावा,’ अशी भूमिका या बैठकीत उद्धव ठाकरेंनी घेतल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे अजूनही मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.