InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

उद्धव ठाकरेंनी मानले पंकजा मुंडेंचे आभार; राजकीय वर्तुळात चर्चेला जोर

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या टि्वटला प्रतिसाद दिला असून त्यांचे आभार मानले आहेत. तीन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी टि्वट करुन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. ‘राज्याचे हित प्रथम’ ही महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा असल्याचे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.

उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांचा आभार मानताना ‘राज्याचे हित प्रथम’ याच संस्कृतीने आणि परंपरेने महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल आणि स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असे आपल्या टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे. पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंचे आभार मानणार टि्वट केले आहे.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.