उद्धव ठाकरे म्हणाले, युतीत 25 वर्षे सडली, मग 2 वर्षात काय कमावलं?, प्रवीण दरेकर आक्रमक

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. तसेच त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला आहे. या वेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, बाबरी मशीद पडल्यानंतर संपूर्ण देशभरात शिवसेनेची लाट उसळली होती. त्याचवेळी शिवसेनेने देशभरात सीमोल्लघंन केले असते, तर आज शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच, भाजपबरोबरच्या युतीत २५ वर्षे सडली, याचा काल पुन्हा पुनरुच्चार केला.

यावरच आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे.25 वर्षे भाजपसोबत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? असा उलट सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. भाजप चांगली वागली म्हणूनच तुम्ही 25 वर्षे संसार केला. आता तुम्हाला कसं वागवलं जात आहे. आता सरकारमध्ये आहात पण सरकारचं सुख ना महाराष्ट्राला ना शिवसैनिकांना,असा टोलाही दरेकर यांनी लगावला. सरकार असूनही आपल्या आमदारांना किती निधी मिळाला याची आकडेवारी जाहीर करा, असेही ते म्हणाले.यावरून महाविकास आघाडीत अंतर्गत वाद स्पष्ट दिसून येते, असेही दरेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या