‘तुम्ही सत्तेत असतांना बाळासाहेबांवर गुन्हा का दाखल केला’; उद्धव ठाकरेंचा पवारांना प्रश्न

सालाबादप्रमाणे या वर्षीही शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवगर्जनेसह पार पडला. राज्यात पुन्हा शिवसेना सत्तेत येणार आहे, असे ठणकावून सांगत कुचराई करू नका, प्रामाणिकपणे काम करून विधानसभेवर भगवा फडकवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकेचे बाण सोडले. शरद पवार, अजित पवार आणि सुशिलकुमार शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं.

Loading...

भाषणादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष शरद पवारांना उद्देशून म्हणाले की, २००० मध्ये तुमचे सरकार असताना तुम्ही महाराष्ट्र धगधगता ठेवला होतात. तेव्हा शिवसेनाप्रमुखांवर खटला का दाखल केला होता. १९९२-९३ मध्ये बाबरी कुठे पडली, पण बाळासाहेबांवर खटला इथं मुंबईत दाखल झाला. त्यावेळी शरद पवारांच्या हाती सत्ता होती, तरीही बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि पवारांना विचारला आहे.

शरद पवार आणि अजित पवार हे आम्ही सुडाचे राजकारण करत असल्याचे आमच्यावर आरोप केले जात आहेत. पण सुडाचे राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत माफ करीत नाही. तेव्हा दोन आठवडे राज्यातील जनतेला छळलं. बाबरी मशीद पडली अयोध्येत, पण दंगल घडली मुंबईत. बॉम्बस्फोट झाले मुंबईत. त्यावेळी सुधाकर नाईक – शरद पवार यांचेच सरकार होते. त्यावेळी शिवसेनेनेच हिंदूंना वाचवण्याचे काम केले. सरकारने ‘सामना’चा जुना अग्रलेख शोधून काढला आणि शिवसेनाप्रमुखांवर गुन्हा दाखल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना आज अटक होणार, उद्या अटक होणार अशा अफवा पसरवून सर्वसामान्यांचे हाल केले. विद्यार्थांना शाळा-कॉलेज सोडावी लागली. शेवटी बाळासाबे स्वतः कोर्टात हजर झाले आणि कोर्टाने सांगितले की ही केसच होऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही गप्प का होतात, असाउलट प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पवारांना विचारला.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.