“उद्धव ठाकरे तर पार्टटाईम मुख्यमंत्री, फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा”

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. ते काय काम करतात हे सर्वांना माहीत आहे.त्यामुळे,राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्र्याची गरज नाही.देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्रीच राज्याला हवा,असं विधान भाजपचे बडे नेते विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी केले आहे.

आज मुंबई येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे.या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी हे विधान केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी उठतात,कधी झोपतात,कधी काम करतात जनतेला सर्व माहीत आहे.या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही.राजकारणाचं गुन्हेगारीकरण यांच्या हातचा मळ झाला आहे”,अशीही सडकून टीका त्यांनी केली आहे.

याशिवाय त्यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीला लक्ष्य करत महाविनाश आघाडी असं संबोधलं आहे. ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीत हिंदूंवर अत्याचार होत आहेत. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद हिंदूना नाव ठेवत आहेत. त्यांच्या सारखी शिवसेना आहे. असं म्हणून “हे सरकार महाविकास आघाडी सरकार नाही तर महाराष्ट्र विनाश सरकार आहे”, असा टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा