शेतकऱ्याच्या लेकीचा हट्ट उद्धव ठाकरेंनी पुरवला….

पक्षप्रमुख यांनी शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यात नुकसान पाहणी दौरा केला. यावेळी साताऱ्यातील काटेवाडीत ंचं एक वेगळं आणि हळवं रुपही पाहायला मिळालं. आपल्या घरी येण्याचा एका शेतकऱ्याच्या मुलीचा हट्ट ंनी पुरवला.

शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत असताना एका शेतकऱ्याची लेक गर्दीतून वाट काढत उद्धव ठाकरेंजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. “मला साहेबांना भेटायचं आहे, मला साहेबांना भेटायचंच आहे,” असं म्हणत ती गाडी जवळ गेली. मात्र ठाकरेंचे सुरक्षारक्षक तिला पुढे जाऊ देत नव्हते. अनेकांनी तिला पुढे न जाण्याचा सल्ला दिला. मात्र मला चेंगरु दे, पण मला साहेबांना भेटायचंच आहे, असा धोशा सुरुच ठेवला. मुलीची धडपड पाहून उद्धव ठाकरेंनी तिला बोलावून काय पाहिजे असं विचारलं. त्यावर तिने काहीही करा आणि माझ्या घरी चला असं सांगितलं. उद्धव ठाकरेंनी तिची समजूत घालत नंतर येईन म्हटलं. परंतु मुलीचा हट्ट कायम होता. “मी तुम्हाला जाऊ देणार नाही, तुम्ही घरी चला,” असं ती वारंवार बोलत होती. अखेर मुलीची धडपड पाहून उद्धव ठाकरेंनी तिचं मन मोडलं नाही.

आपल्याच गाडीत कांचनला बसवत उद्धव यांनी थेट तिचं घर गाठलं. कांचनच्या घरी झालेलं स्वागत उद्धव यांना आयुष्यभर लक्षात राहिल असंच होतं. कांचनच्या घरच्यांनी केलेलं औक्षण पाहून स्वत: ठाकरेही भारावले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या घरी आल्यावर कांचनच्या कुटुंबियांनाही आनंदाचं भरतं आलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.