Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर ताबा सांगितला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना पक्ष्याच्या मालकीबाबच कायदेशीर लढाई सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी करताना उद्धव गटाला दिलासा दिला आहे. शिंदे गटाच्या अर्जावर तूर्तास कोणताही निर्णय घेऊ नये, असे न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

तत्पूर्वी, बुधवारीही सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली असून तेथे दोन्ही गटांनी आपली बाजू मांडली होती. हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. दोन्ही पक्षांच्या लेखी युक्तिवादाची पडताळणी केली जाईल. सुनावणीदरम्यान शिंदे गटाके वकील हरीश साळवे त्यांच्या वतीने प्रस्तावित सुनावणीचे मुद्दे मांडत आहेत. अपात्रतेबाबत सभापतींचे अधिकार आणि प्रक्रिया कशी पार पाडावी याबाबत साळवे अनेक मुद्दे मांडत आहेत. त्यांच्यावर सुनावणीची मागणी केली.

शिवसेना कुणाची? घटनापीठ नेमण्याचे संकेत-

सध्या सरन्यायाधीश एन व्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान सोमवारी या प्रकरणात न्यायालय घटनापीठ नेमण्याची शक्यता आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांना सुनावणीच्या मुद्यांचे संकलन सादर करण्यास सांगितले होते.

पक्षाच्या चिन्हांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये-

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला कोणतेही आदेश न घेण्याचा आदेश दिला असून प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. सर्वांचे लिखीत युक्तिवाद पडताळले जातील असंही कोर्टाने सांगितलं आहे. तसते पक्षाच्या चिन्हांबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे.

निवडणूक आयोगाचे वकीलही झाले होते सहभागी-

आजच्या सुनावणीत महत्त्वाची बाब म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या वकिलांनाही पाचारण केले आहे. खरी शिवसेना कोण, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का, असा प्रश्न सुनावणीदरम्यान उपस्थित झाला. न्यायमूर्ती म्हणाले की, कोणी आयोगाकडे गेले तर त्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.