आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे मोदींना पत्र लिहतील; चंद्रकांत पाटलांचा टोला

पुणे : “उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील,” असा टोमणा देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्याचसोबत मराठा आरक्षण, फडणवीस-पवार भेट या मुद्द्यांवरही त्यांनी माध्यमांशी बोलताना चर्चा केली.

फडणवीस-पवार भेटीबद्दल पाटील म्हणाले, “शरद पवारांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया ताईंना विनंती केली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. महाविकास आघाडीला वाटतं की जनता मूर्ख आहे असंही ते यावेळी म्हणाले. “गेल्या दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही. त्यामुळे इथं केंद्राचा काहीही संबंध नाही. पण हे सरकार कोडगं आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघायची असेल तेव्हाही उद्धव ठाकरे पंतप्रधानांना पत्र लिहतील, तुमच्या बघण्यातली दिल्लीतली कोण असेल तर सांगा म्हणून,” अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा