उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील – अब्दुल सत्तार

राज्यातील सत्तास्थापनेसाठी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर अंतिम चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी शिवसेनेशी बोलण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचसोबत शिवसेनेने आमदारांना २२ नोव्हेंबरला मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पण यावेळी येताना ओळखपत्रासह ५ दिवसांचे कपडे घेऊन येण्यास सांगितले आहे.

याबाबत बोलताना शिवसेना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, २२ तारखेच्या बैठकीसाठी मुंबईत शिवसेनेचे आमदार येणार आहेत. २-३ दिवस आमचा मुक्काम मुंबईत असण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होईल. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील हे खात्रीशीर सांगू शकतो असं त्यांनी सांगितले. तसेच २५ नोव्हेंबरला शपथविधी होण्याचीही शक्यता त्यांनी बोलून दाखविली आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.