InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘उद्धव ठाकरेंची काँगेस-राष्ट्रवादी बरोबरची आघाडी अपवित्र’

- Advertisement -

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर केलेली आघाडी अपवित्र असल्याचा हल्लाबोल माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला आहे. यवतमाळ येथे बोलताना अहीर म्हणाले की, ‘काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे विचार कुठेही जुळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावातच राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवाद कुठेही दिसत नाही. केवळ सत्तेसाठी तिघेही एकत्र आले आहे. त्यांचे विचार, कार्यक्रम कुठेही जुळत नाही. भाजप, शिवसेना यांनी राममंदिर, हिंदुत्व हा मुद्दा घेऊन लढा दिला.’

‘बाळासाहेब ठाकरे आम्हाला पूजनीय आहेत. उद्धव ठाकरे हे त्यांचे पुत्र, विचारांचे वारसदार ठरतात. त्यांनी भगवे कपडे घालून घेतलेली शपथ काँग्रेस नेत्यांना बघवली नाही. त्यामुळे ही महाविकास आघाडी खूप दिवस टिकणार नाही,’ असा दावा माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला.

Loading...

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.