‘विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देणं हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट’; भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी ठाणे, रायगड, पालघरमधील स्थानिक भूमीपुत्रांनी मांडली आहे. त्यावरून आता स्थानिक विरूद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. त्यात आता मनसेचे आमदार राजू पाटील आणि भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनी उडी घेतली आहे.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव दिलं पाहिजे. स्थानिक भूमिपुत्र म्हणून ही आमची प्रमुख मागणी आहे, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा आग्रह म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालहट्ट आहे. उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. पण त्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल अजिबात आस्था नाही. भाजप या मुद्द्यावर राजकारण अजिबात करत नाही, परंतु आम्ही स्थानिक भूमीपुत्रांच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा