उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट वादात; भाजपने केले अफरातफर झाल्याचे गंभीर आरोप

मुंबई : आगामी मुंबई महागरपालिकेच्या निवडणूका तोंडावर येऊन ठेवपल्या आहेत. यातच आता राजकीय वातावरण देखील गरम होऊ लागलं आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. भाजपकडून या सत्ताकेंद्राला हादरे देण्याचे अनेक प्रयत्न होतं आहेत. अशातच आता भाजपने सत्ताधारी शिवसेनेला आरोपीला पिंजऱ्यात उभे करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अफरातफर झाली असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. कॅगच्या अहवालाचा दाखला देत त्यांनी महापालिका प्रशासन, सत्ताधारी शिवसेना आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपांचे बाण सोडले. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ समजला जातो.

तसेच रोड प्रकल्पासंदर्भात कॅगनं एप्रिल महिन्यात सादर केलेल्या अहवालात नमूद केलेले मुद्दे सादर केले. कोस्टल रोड प्रकल्पामध्ये कंत्राटदार आणि सल्लागारांना फायदेशीर ठरतील अशा पद्धतीने निर्णय घेतले गेले आणि त्यांच्या बिलांचे पैसे दिले गेले, असा आरोप कॅगच्या अहवालातील तरतुदींच्या आधारावर आशिष शेलार यांनी केला. तसेच, पर्यावरण मंत्र्यांनी यासंदर्भात खुलासा करण्याची देखील मागणी आशिष शेलार यांनी केली.

मुंबई कोस्टल रोडला मान्यता देताना ज्या अटी आणि शर्थी केंद्र सरकारनं घालून दिल्या होत्या त्या पाळण्यात आल्या नाहीत. वाहतुकीचं निरीक्षण योग्य पद्धतीनं करण्यात आलं नाही. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावीत, असं शेलार यांनी म्हटलं आहे. परिणामी सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पावर टीका झाल्यानं शिवसेनेकडून शेलार यांना घेरण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा