युतीसाठी उद्धव ठाकरेंची भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर: म्हणाले, ‘एकत्र आलो तर भावी सहकारी’

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आज पुष्पचक्र अर्पण करुन मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मांना अभिवादन केलं. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे एकाच व्यासपिठावर होते. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी आणि दानवेंनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं.

तसेच पुढे औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. यानंतर राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रावसाहेब दानवेंना शब्द देतो, तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी पुढाकार घ्या, आम्ही खंबीर पाठीशी राहतो” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते.

तर मराठवाड्यात आपण आपआपसात भांडत कशाला बसायचं? नालायकपणे कारभार करुन आपणही भांडत राहिलो तर फरक काय राहिला. अपेक्षेशिवाय आयुष्य असू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे आणि आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करायच्या. एकत्र आलो तर भावी सहकारी होऊ, असे सूचक विधान करुन मुख्यमंत्र्यांनी नव्या राजकीय चर्चेला सुरूवात केली आहे. भर सभेत केलेल्या या विधानामुळे मुख्यमंत्र्यांचे भावी सहकारी कोण असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा