भाजपला ‘शिवप्रसाद’ देणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप !

मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात राममंदिर ट्रस्टने खुलासा करण्याची मागणी केली गेली होती. शिवसेनेने केलेल्या या मागणीनंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेना भवनासमोर शिवसैनिकआणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती.

या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दादर, माहीम आणि वडाळा विभागातील सर्व शिवसैनिकांची, पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांची पाठ थोपटली. शिवसेनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याचे फोटोही शेअर केले केले आहेत. हे फोटो ट्विट करताना शिवसैनिक आणि शिवसेना पक्ष प्रमुख इतकाच उल्लेख करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा