InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

उध्दव ठाकरे यांनी एकही फोन केला नाही, त्यांची आघाडीसोबतच चर्चा – देवेंद्र फडणवीस

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना निवडणूक निकालानंतर घेतलेली भुमीकेने आपल्याला धक्का बसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आमचे सर्व पर्याय खुले आहेत हे शिवसेनेने म्हटले होते. पर्याय खुले असल्याच्या शिवसेनेची भूमिका धक्कादायक आहे. अशी भूमिका मांडण्याचे कारण समजू शकले नाही. माझ्या समोर कधीही अडीच वर्षाच्या विषयावर निर्णय झाला नव्हता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अडीच वर्षाबाबत वरिष्ठांनी कुठलाच पर्याय दिला नाही. समज गैरसमज चर्चेतून सुटतात. आम्ही सातत्याने चर्चा केली. भाजपसोबत चर्चा करायची नाही. फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करायची हे धोरण शिवसेनेने स्विकारले. शिवसेनेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. उध्दव ठाकरे यांनी एकही फोन केला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.