“उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण म्हणजे ‘प्रबोधनकार ठाकरे’ इज बॅक”

मुंबई : शिवसेना दसरा मेळावा होणार आहे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. या मेळाव्यातल मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकताही सर्वांना लागून राहिली होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर थेट निशाणा साधला आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात आज पार पडला.

प्रतिवर्षी शिवाजी पार्कवर होणार सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, आपला आवाज दाबणारा जन्माला यायचाय,” अशी सुरुवात करत अनेकांवर बाण डागला. त्यांच्या कालच्या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कौतुक केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख यांचे दसरा मेळाव्यातील आजचे भाषण म्हणजे ‘सौ सोनार की एक लोहार’ असं होतं. महाराष्ट्राच्या मनातील अनेक वर्षांची खदखद देशासमोर मांडल्याबद्दल उद्धवजी ठाकरे यांचे आभार असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला ‘प्रबोधनकार ठाकरे इज बॅक’ असं ट्विट अमोल मिटकरींनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा