….. त्यासाठी कमरेवरचे सोडावे लागले तरी चालेल; असे भाजपचे धोरण – उद्धव ठाकरे

मुंबई डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनची एक निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत आंतरराष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला यावर शिवसेना प्रमुख यांनी ातून ा सरकारला टोला लगावला आहे.

‘कोणतीही निवडणूक सत्ता व धनाचा वापर करून जिंकायची हे भाजपचे धोरण आहे. चंद्रपूरच्या पत्रकार संघापासून मुंबईच्या ‘प्रेस क्लब’ निवडणुकीतही भाजपवाले त्यांचे पॅनल उतरवू लागले. काहीच सोडायचे नाही व त्यासाठी कमरेवरचे सोडावे लागले तरी चालेल, हे त्यांचे धोरण आहे. आम्ही मात्र स्वाभिमानाने लढत आहोत व लढाई सुरूच राहील. हाऊसिंग फेडरेशनचा विजय ज्यांना मोठा वाटतोय त्यांना उद्याच्या मोठय़ा पराभवाचा सामना नक्कीच करावा लागेल.’, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या अग्रलेखात लिहिले आहे.

आजचा सामना अग्रलेख – 

कोणतीही निवडणूक सत्ता व धनाचा वापर करून जिंकायची हे भाजपचे धोरण आहे. चंद्रपूरच्या पत्रकार संघापासून मुंबईच्या ‘प्रेस क्लब’ निवडणुकीतही भाजपवाले त्यांचे पॅनल उतरवू लागले. काहीच सोडायचे नाही व त्यासाठी कमरेवरचे सोडावे लागले तरी चालेल, हे त्यांचे धोरण आहे. आम्ही मात्र स्वाभिमानाने लढत आहोत व लढाई सुरूच राहील. हाऊसिंग फेडरेशनचा विजय ज्यांना मोठा वाटतोय त्यांना उद्याच्या मोठय़ा पराभवाचा सामना नक्कीच करावा लागेल.

मुंबई डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनची एक निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत म्हणे आंतरराष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने देदीप्यमान विजय मिळवल्याचे नगारे प्रसिद्धी माध्यमांतून वाजवले जात आहेत. (अर्थात पेडन्यूज) भाजपप्रणीत एक ‘रगडापेटीस, ढोकला छाप’ असे सर्वपक्षीय पॅनल विजयी झाले. अर्थात त्याहीपेक्षा शिवसेनेचे पॅनल कसे जिंकले नाही व त्यास दारुण पराभवास कसे सामोरे जावे लागले अशा बातम्या पेरून ‘जितंमय्या’चा ढोल वाजवणाऱ्यांची अक्कल बहुधा गहाण पडलेली दिसते. म्हटले तर ही निवडणूक प्रतिष्ठेची, म्हटले तर नेहमीप्रमाणे एखाद्या जीर्णशीर्ण झालेल्या संस्थेची.

आतापर्यंत अशा संस्थांत नेमके कोण काय करीत होते ते समजलेच नाही. एक ते रघुवीर सामंत होते जे हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करीत होते. आता या संस्थेतही भाजपची भ्रष्ट घुसखोरी सुरू झाली तेव्हा शिवसेना रिंगणात उतरली. शिवसेना रिंगणात उतरताच काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, एम.आय.एम. असे एक सर्वपक्षीय पॅनल उभे केले गेले. शिवसेना या कडबोळय़ात सामील झाली नाही व स्वतंत्रपणे लढली.

भाजपच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय कडबोळे पॅनलला एक हजार 450 च्या आसपास मते मिळाली. तर एक हजार 250 इतकी मते मिळवली. अर्थात या निवडणुकीतील पद्धत वेगळी असल्याने इतकी मते मिळूनही शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाला असे बोलणाऱ्यांनी स्वतःच्या अकलेची दिवाळखोरीच सिद्ध केली. केवळ तीन हजार संस्थांनी मतदान केले. मुख्यमंत्री, गृहनिर्माणमंत्री, त्यांचे राजकीय ‘अर्थमंत्री’ हे जणू हाऊसिंग सोसायट्यांची मते विकत घेण्यासाठीच या निवडणुकीत उतरले. शिवसेनेला विजयी होऊ द्यायचे नाही यासाठी भाजपने पाच कुबडय़ा वापरल्या. त्यामुळे नैतिक विजय हा शिवसेनेचाच झाला.

शिवसेनेने स्वबळावर ही निवडणूक लढवली व झुंज दिली. पालघर पोटनिवडणुकीचीच पुनरावृत्ती येथे झाली. मुंबईतील गृहनिर्माण संस्थांची ही प्रातिनिधिक संघटना आहे. गृहनिर्माण संस्थांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हाऊसिंग सोसायट्यांचे प्रश्न सरकारदरबारी पोहोचवणारी संस्था म्हणून या फेडरेशनकडे पाहिले जाते. मुंबईतील अनेक नव्हे, हजारो गृहनिर्माण संस्थांना भोगवटा प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. त्यामुळे या संस्था बेकायदेशीर ठरवल्या जातात. अनेक गृहनिर्माण संस्थांना घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न भेडसावतो आहे. बृहन्मुंबईतील 500 चौरस फूट क्षेत्राच्या सदनिकांचा प्रस्ताव शिवसेनेने सरकारदरबारी पाठवला आहे व यामुळे अनेकांना दिलासा मिळेल. त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी ही आता जिंकलेल्या नव्या सर्वपक्षीय कडबोळे पॅनलवर येऊन पडली आहे.

इमारतीचे कन्व्हेअन्स म्हणजे अभिहस्तांतरणाची प्रक्रिया जटील होत आहे. विकासक त्यात अडथळे आणत असतो. अशा विकासकांना सरळ करण्याचे वचन निवडणुकीपूर्वी शिवसेनेने दिले होते. आता या सर्व प्रश्नी सर्वपक्षीय कडबोळे पॅनल काय करते ते पाहायचे. कोणतीही निवडणूक सत्ता व धनाचा वापर करून जिंकायची, नव्हे विजय विकत घ्यायचा हे भाजपचे धोरण आहे. असा विजय काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएमच्या मदतीने मिळाला तरी त्या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वास दिले जाते, हा मोठाच विनोद आहे.

चंद्रपूरच्या पत्रकार संघापासून मुंबईच्या ‘प्रेस क्लब’ निवडणुकीतही भाजपवाले त्यांचे पॅनल उतरवू लागले. काहीच सोडायचे नाही व त्यासाठी कमरेवरचे सोडावे लागले तरी चालेल, हे त्यांचे धोरण आहे. आम्ही मात्र स्वाभिमानाने लढत आहोत व लढाई सुरूच राहील. हाऊसिंग फेडरेशनचा विजय ज्यांना मोठा वाटतोय त्यांना उद्याच्या मोठय़ा पराभवाचा सामना नक्कीच करावा लागेल.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.