InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सोलापूर विद्यापीठात पत्रकारिता पदवीच्या अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

- Advertisement -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विदयापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाच्यावतीने बॅचलर ऑफ व्होकेशनल पत्रकारिता व जनसंज्ञापन हा पदवी  अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजुरी दिल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे .

दरम्यान हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विदयाशाखेच्या विदयार्थ्यांना प्रवेश घेता येईल. हा अभ्यासक्रम कौशल्य विकासावर आधारित असल्याने हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विदयार्थ्यांना वृत्तपत्रे, रेडिओ, टीव्ही, सिनेमा, ऑनलाईन पत्रकारिता , जनसंपर्क, जाहिरात तसेच शासकीय क्षेत्रात  नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. तसेच या कौशल्यांचा उपयोग करुन स्वतःचा व्यवसाय सुरु करता येईल

- Advertisement -

पत्रकारिता आणि जनसंज्ञापन या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांनी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, असे आवाहन सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी. एस. कांबळे यांनी केले आहे. या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी विदयापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर   यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विदयापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.